झोटी चीता (ଝୋଟି ଚିତା) ही ओरिसा राज्यातील उत्सवांशी संबंधित एक रांगोळी आहे. [1]कार्तिक आणि मार्गशीर्ष महिन्यात साजर्या केल्या जाणार्या सुदासव्रताचा हा एक पारंपरिक भाग मानला जातो.गुंतागुंतीची नक्षी असलेली विविध प्रकारची रांगोळी हे याचे वैशिष्ट्य आहे.

. . . झोटी चीता . . .
मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी लक्ष्मी देवतेचे पूजन महिला घरोघरी करतात. या पूजनातील विशेष अलंकरण भाग म्हणून झोटीला महत्वाचे स्थान आहे. शेतातील नवे धान्य कोठारात भरून घरात या काळात समृद्धी येत असल्याने तिच्या स्वागतासाठी हा उत्सव साजरा केला जातो. देवीचे विशेष स्वागत करणारी नक्षी अशी झोटी चीता मागील कल्पना आहे.[2]
तुळशी वृंदावन,भिंती,स्वयंपाकघर,देवघर/प्रार्थनाघर,जमिनी, उंबरठा अशा सर्व ठिकाणी ही रांगोळी काढली जाते.ओरिसातील ग्रामीण भागात रस्ते स्वच्छ केले जातात. घराचे अंगण,ओसरी सारविली जाते आणि नंतर त्यावर हे सर्व नक्षी आरेखन केले जाते. आदिवासी बहुल भागात त्यांनी त्यांच्या धारणेनुसार आणि समजुतीनुसार काढलेली पारंपरिक विविध प्रकारची नक्षी दिसून येते.[3]
. . . झोटी चीता . . .