रॉयल स्टॅग, ज्यास सीग्राम रॉयल स्टॅग या नावानेही ओळखले जाते. हा एक व्हिस्कीचा हा भारतीय ब्रँड आहे. ह्याची सुरुवात १९९५ मध्ये झाली होती. ही व्हिस्की जगभरातील अनेक देशांमध्ये विविध आकारात उपलब्ध आहे. आकारमानानुसार पर्नोड रिकार्डचा हा सर्वाधिक विक्रीचा ब्रँड आहे. ही व्हिस्की भारतीय धान्य आणि आयात केलेल्या स्कॉच माल्टच्या मिश्रणातून बनवली जाते. ही सहसा १ लिटर, ७५० मिली, ३७५ मिली आणि १८० मिली बाटल्यांमध्ये उपलब्ध असते. तसेच ९० मिली आणि ६० मिली बाटल्यांमध्ये देखील उपलब्ध आहे. या ब्रँडचे नाव हरणाच्या शिंगावरुन ठेवले गेले आहे. तसेच त्याच्या लोगोमध्ये हे दिसतात. ही व्हिस्की अनेक कंपनी-मालकीच्या तसेच बाटल्या बनवणाऱ्या कंपनी-मालकीच्या डिस्टिलरीजमध्ये तयार केली जाते. हा व्हिस्कीचा भारतातील पहिला ब्रँड होता ज्यात कोणत्याही कृत्रिम चवीचा वापर केलेला नव्हता. पर्नोड रिकार्डने रॉयल स्टॅग बरोबर सीग्राम इम्पीरियल ब्लू, सीग्राम ब्लेंडर प्राइड, शिवास रीगल आणि सीग्राम १०० पाईपर्स असे कंपनीचे पाच मुख्य ब्रांड्स चालु केले. रॉयल स्टॅगने २०११ मध्ये भारतात १.२३ करोड बाट्ल्या विकल्या. ॲब्सोलुट वोदकाला मागे टाकत, त्याच्या अल्कोहोलिक पेय पदार्थांच्या जागतिक पोर्टफोलिओमध्ये पेरनोड रिकार्डचा सर्वात मोठा विक्री करणारा ब्रँड बनला. रॉयल स्टॅगने २०१६ मध्ये १.८ करोड बाट्ल्या विकल्या.
. . . रॉयल स्टॅग . . .
सीग्राम रॉयल स्टॅग व्हिस्की 1995 मध्ये सुरु झाली होती. [1][2][3] या ब्रॅण्डने गुळांचा वापर न करता त्याऐवजी स्कॉच माल्ट्ससह धान्य मिसळुन एक नविन पध्दत चालु केली. लांब शिंग असणार्या हरणांच्या प्रजातीचे चित्र याचा लोगो आहे. याच्या नावातही स्टॅग हे त्याचेच प्रतिनिधित्व करते. [4][5] हा व्हिस्कीचा भारतातील पहिला ब्रँड होता ज्यात कोणत्याही कृत्रिम चवीचा वापर केलेला नव्हता. [6][7] ही व्हिस्की हे इतर धान्ये आणि आयात केलेल्या स्कॉच माल्टचे मिश्रण आहे. [6] सीग्रामचा जागतिक व्यवसाय डिसेंबर २००० मध्ये पर्नोड रिकार्ड आणि डिएगो या दोघांनी एकत्रित खरेदी केला. नंतर दोन्ही कंपन्यांनी त्यांच्या दरम्यान अगोदरच झालेल्या स्वाक्षरी करारानुसार सीग्रामच्या व्यवसायाचे विभाजन केले. [8][9]
२००१ च्या वर्षामध्ये रॉयल स्टॅग दरमहा १,२५,००० हून अधिक युनिट्स विकत होता. [10] आणि २००२ मध्ये सुमारे १.७५ दशलक्ष युनिट्स विकली. [11] २००४ च्या वर्षात या ब्रँडची वार्षिक विक्री ३ दशलक्षांच्या पुढे गेली. [12] आणि २००६ मध्ये ती सुमारे ४ दशलक्षच्याही पुढे वाढली. [13] इम्पॅक्ट इंटरनॅशनलच्या २००८ च्या “सर्वात छाने १०० ब्रँड्स” च्या यादीत रॉयल स्टॅग भारतीय स्पिरिट्स ब्रँडमध्ये दुसर्या क्रमांकावर होता. त्याची रिटेल व्हॅल्यू ५०५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स होती. [14] २००९ मध्ये या ब्रँडने ८ दशलक्ष आणि २०१० मध्ये जवळपास १०.६ दशलक्ष युनिट्सची विक्री नोंदविली. [15] रॉयल स्टॅगने २०११ मध्ये १२.३ दशलक्ष युनिट्स विकली आणि तोपर्यंत ११.३ दशलक्ष युनिट्स विकणारी अॅब्सोलुट वोडकाला मागे टाकले आणि जागतिक स्तरावरील अल्कोहोलयुक्त पेय पदार्थांमध्ये पेरनोड रिकार्डचा सर्वात मोठा विक्रीचा ब्रँड बनला. [16]
पर्नॉड रिकार्डने रॉयल स्टॅगची प्रीमियम आवृत्ती, रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट नावाची डिसेंबर २०११ मध्ये भारत, आखाती आणि इतर काही आशियाई बाजारात बाजारात आणली. [17] भारतीय व्हिस्की मार्केटमध्ये बॅरल सिलेक्ट अनुक्रमे कंपनीच्या रॉयल स्टॅग आणि ब्लेंडर प्राइड ब्रँड्सच्या ताब्यात असलेल्या डिलक्स आणि प्रीमियम सेगमेंट दरम्यान स्थित आहे. [18] युनायटेड किंगडम-आधारित ब्रँडिंग आणि पॅकेजिंग सल्लागार कार्टिल्स यांनी बॅरेल सेलेक्टसाठी धोरणात्मक स्थिती, ब्रँडिंग, बाटलीचा आकार, पॅकेजिंग आणि मोनो कार्टन विकसित केले. कार्टिलला वाटले की पोर्टफोलिओ चे नुकसान टाळण्यासाठी बॅरल सिलेक्टला रॉयल स्टॅगपेक्षा अधिक प्रीमियम पातळीवर उंचावणे आवश्यक आहे तसेच ब्रँडची ओळख जपणेही आवश्यक आहे. बॅरल सिलेक्ट बाटलीचा आयताकृती आकार रॉयल स्टॅग प्रमाणेच आहे, परंतु त्याला थोडे थोडे टेपर केलेले आहे. बाटलीमध्ये रॉयल स्टॅग लोगोचा एक भाग असलेल्या स्टॅगची प्रभावीपणे स्थिती असलेल्या सोनेरी दोन-रंगातील चित्रण देखील केलेले आहे. [19][20][21]
. . . रॉयल स्टॅग . . .