MR

वेंगणी

वेंगणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातीलपालघर तालुक्यातील एक गाव आहे.

  ?वेंगणी
महाराष्ट्र  भारत
  गाव  
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ .३४५ चौ. किमी
जवळचे शहर पालघर
जिल्हा पालघर जिल्हा
लोकसंख्या
घनता
६१० (२०११)
• १,७६८/किमी
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा आदिवासी कातकरी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड
• ४०१५०२
• +०२५२५
• एमएच४८

. . . वेंगणी . . .

बोईसर रेल्वे स्थानकापासून पश्चिमेला तारापूर मार्गाने गेल्यावर पाचमार्गावर डावीकडे जाणाऱ्या रस्त्यावर हे गाव लागते.बोईसर रेल्वे स्थानकापासून हे गाव १० किमी अंतरावर आहे.

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १६६ कुटुंबे राहतात. एकूण ६१० लोकसंख्येपैकी ३०६ पुरुष तर ३०४ महिला आहेत. गावाची साक्षरता ८३.३० टक्के आहे.पुरुष साक्षरता ८९.८६ आहे तर स्त्री साक्षरता ७६.६८ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ४१ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या ६.७२ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन,बकरीपालन सुद्धा ते करतात.

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस बोईसर रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. अॉटोरिक्शा बोईसर रेल्वे स्थानकावरुन दिवसभर उपलब्ध असतात.

. . . वेंगणी . . .

This article is issued from web site Wikipedia. The original article may be a bit shortened or modified. Some links may have been modified. The text is licensed under “Creative Commons – Attribution – Sharealike” [1] and some of the text can also be licensed under the terms of the “GNU Free Documentation License” [2]. Additional terms may apply for the media files. By using this site, you agree to our Legal pages . Web links: [1] [2]

. . . वेंगणी . . .

Back To Top