MR

सुबोध भावे

सुबोध भावे (जन्म : ९ नोव्हेंबर १९७५) हा एक मराठी अभिनेता आहे. त्याने चित्रपट, नाटक आणि दूरचित्रवाणी मालिका या तीनही माध्यमांत कामे केली आहेत. त्यांनी चित्रपटात केलेली बालगंधर्व यांची भूमिका खूप वाखाणली गेली. कॉलेजमध्ये असतांनाच भावे नाटके दिग्दर्शित करीत असत. त्यांनी पुरुषोत्तम करंडकांत सादर केलेल्या एकांकिकांना पारितोषिके मिळाली आहेत.

सुबोध भावे
जन्म ०९ नोव्हेंबर १९७५
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख नाटके कट्यार काळजात घुसली
प्रमुख चित्रपट बालगंधर्व, लोकमान्य टिळक, कट्यार काळजात घुसली, आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर
प्रमुख टीव्ही कार्यक्रम का रे दुरावा, अवघाचि संसार, तुला पाहते रे
पुरस्कार झी मराठी अँवार्ड 2009 सर्वोत्कृष्ट जोडी कुलवधू आणि 2018सर्वोत्कृष्ट नायक तुला पाहते रेसाठी.
पत्नी मंजिरी सुबोध भावे
अपत्ये कान्हा, मल्हार

सुबोध भावेंनी ५० पेक्षा अधिक हिंदी-मराठी चित्रपटांत काम केले असून अनेक मराठी नाटकांमधून तसेच अनेक दूरचित्रवाणी मालिकांमधून अभिनय केला आहे. घुमान येथे २०१५ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात झालेल्या ‘महाराष्ट्र रांगडा-पंजाबी भांगडा’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम पुण्यातील पायलवृंद या संस्थेने सादर केला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुबोध भावे व मृणाल कुलकर्णी यांचे होते.

. . . सुबोध भावे . . .

सुबोध भावे यांच्या पत्‍नीचे नाव मंजिरी असून त्या मुंबईत स्वतंत्र उद्योजिका आहेत. या दाम्पत्याला कान्हा व मल्हार हे दोन मुले आहेत.

 • आता दे टाळी
 • कट्यार काळजात घुसली (दिग्दर्शन)
 • कळा या लागल्या जीवा
 • मैतर
 • महासागर
 • येळकोट
 • लेकुरे उदंड झाली
 • स्थळ स्नेह मंदिर
 • धुक्यात हरवली वाट
 • मुले चोर पकडतात (बालनाट्य)
 • अश्रूंची झाली फुले
 • अग्निदिव्य (२००९)
 • अनुमती (२०१३)
 • अय्या (हिंदी) (माधव राजाध्यक्ष) (२०१२)
 • आईशप्पथ (श्रीरंग) (२००६)
 • आटपाडी नाईट्स
 • आप्पा आणि बाप्पा (२०१९)
 • आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर (२०१८)
 • आम्ही असू लाडके (अभिजीत बुद्धिसागर) (२००५)
 • अर्धांगिनी एक अर्धसत्य (हिंदी) (२०१६)
 • आव्हान (२०१५)
 • उलाढाल (२००८)
 • एक निर्णय (२०१९)
 • एकदा काय झाले बायको उडाली भुर्र
 • एबी आणि सीडी (२०२०)
 • अ रेनी डे ((२०१४)
 • एक डाव धोबी पछाड (२००८)
 • ओलीसुकी (२००१)
 • कट्यार काळजात घुसली (दिग्दर्शन व अभिनय) (२०१५)
 • कथा तिच्या लग्नाची (२००९)
 • करार (२०१७)
 • कवडसे
 • कोण आहे रे तिकडे? (२०१०)
 • कंडिशन्स अप्लाय – अटी लागू (२०१७)
 • गोळाबेरीज (२०१२)
 • चिंटू (२०१२)
 • चिंटू २ – खजिन्याची चित्तरकथा (२०१३)
 • छंद प्रीतीचा
 • झाले मोकळे आकाश
 • टूरिंग टॉकिज (२०१३)
 • ती आणि इतर (२०१७)
 • ती रात्र
 • तो आणि मी एक ऋणानुबंध (२०१६)
 • त्या रात्री पाऊस होता (२००९)
 • तुला कळणार नाही (२०१७)
 • दुर्गे दुर्गट भारी (२००५)
 • ध्यासपर्व (२००१)
 • पाऊलवाट (२०११)
 • पाश (२००५)
 • पेन्नेयम (मल्याळम्) (२०१६)
 • पोस्टकार्ड (२०१४)
 • फुगे (२०१७)
 • बालकपालक (बी.पी.) (२०१२)
 • बालगंधर्व (२०११)
 • बंध नायलॉनचे (२०१६)
 • भयभीत (२०२०)
 • भारतीय (२०१२)
 • भो भो (२०१६)
 • महात्मा बसवेश्वर (१९९०)
 • मन पाखरू पाखरू (२००८)
 • माझा अगडबम (२०१८)
 • माझा भाऊ मकरंद
 • माझी आई (२००७)
 • मिशन चॅम्पियन (२००५)
 • मी तुझीच रे (२००५)
 • मोहत्यांची रेणुका (२००५)
 • रानभूल (२०१०)
 • लाडीगोडी (२०१०)
 • लालबागचा राजा (२००५)
 • लोकमान्य – एक युगपुरुष (२०१५)
 • वचनबद्ध (२००५)
 • वादा रहा सनम (हिंदी) (२००५)
 • विजेता (२०२०)
 • वीर सावरकर (२००५)
 • वेलकम होम
 • शुभ लग्न सावधान (२०१८)
 • सखी (२००७)
 • सत्तेसाठी काहीही (२००५)
 • सनई चौघडे (२००८)
 • सविता दामोदर परांजपे (२०१८)
 • स्वामी पब्लिक लिमिटेड (२०१४)
 • श्री सिद्धीविनायक महिमा (२००७)
 • हापूस (२०१०)
 • हृदयांतर (२०१७)
 • क्षण (२००६)
 • क्षणोक्षणी (२००१)
 • पुष्पक विमान (२०१८)

. . . सुबोध भावे . . .

This article is issued from web site Wikipedia. The original article may be a bit shortened or modified. Some links may have been modified. The text is licensed under “Creative Commons – Attribution – Sharealike” [1] and some of the text can also be licensed under the terms of the “GNU Free Documentation License” [2]. Additional terms may apply for the media files. By using this site, you agree to our Legal pages . Web links: [1] [2]

. . . सुबोध भावे . . .

Back To Top